राष्ट्रपती २४ पासून चीनच्या दौर्‍यावर

0
88

राष्ट्रपती प्रणब मुखर्जी २४ ते २७ मे असे तीन दिवस चीनच्या दौर्‍यावर जाणार आहेत. या दौर्‍यात ते तेथील प्रमुख नेते व उद्योगपतींची भेट घेणार आहेत. परराष्ट्र मंत्रालयानुसार ६ वर्षांनंतर पहिल्यांदाच भारताचे राष्ट्रपती चीनचा दौरा करणार आहेत. यापूर्वी २०१० मध्ये तत्कालीन राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांनी चीनला भेट दिली होती. भारत – चीन द्विपक्षीय संबंध मजबूत करणे हा या भेटीचा मुख्य उद्देश आहे.