सरकारने राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांच्या नागरी सत्कार सोहळ्यात विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांचा योग्य आदर न राखता शिष्टाचाराचे उल्लंघन केले आहे, अशी टीका कॉंग्रेसचे प्रवक्ते संकल्प आमोणकर यांनी पत्रकार परिषदेत काल केली. या सोहळ्यात विरोधी पक्षनेते चंद्रकांत कवळेकर यांना व्यासपीठावर स्थान देण्यात आले नाही. सरकारने राष्ट्रपतींचा नागरी सत्कार सोहळा तमाम गोमंतकीयांच्यावतीने आयोजित केला होता. त्यामुळे या सोहळ्यात व्यासपीठावर विरोधी पक्षनेत्यांना स्थान देणे आवश्यक होते. परंतु, सरकारने शिष्टाचाराचे पालन केले नाही. विरोधी पक्षनेते कवळेकर नागरी सन्मान सोहळ्याला उपस्थित असतानाही त्यांचा मान राखला नाही, अशी टीका आमोणकर यांनी केली.