भाजपच्या पाचव्या यादीत 111 उमेदवारांची घोषणा

0
9

भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीनंतर भाजपने काल रविवारी लोकसभा निवडणुकीसाठी 111 उमेदवारांच्या नावांची यादी जाहीर केली आहे. या यादीत आंध्र प्रदेश 6, बिहार 17, गोवा 1, गुजरात 6, हरियाणा 4, हिमाचल प्रदेश 2, झारखंड 3, कर्नाटक आणि केरळमधून 4, महाराष्ट्रातील 3, मिझोरम 1, ओडिशा 18, राजस्थान 7, सिक्कीम 1, तेलंगणा 2, उत्तर प्रदेश 13 आणि पश्चिम बंगालच्या 19 उमेदवारांच्या नावांची घोषणा भाजपकडून करण्यात आली आहे.

402 उमेदवार जाहीर
भाजपकडून यापूर्वी चार याद्या जाहीर करण्यात आल्या होत्या. भाजपने पहिल्या यादीत 195 , दुसऱ्या यादीत 72, तिसऱ्या यादीत 9 आणि चौथ्या यादीत 15 उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली होती. भाजपने पहिल्या चार याद्यांमध्ये 291 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली होती. काल भाजपने पाचव्या यादीत 111 उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असून आतापर्यंत पाच याद्यांद्वारे एकूण 402 भाजप उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आली आहे.

कंगना, अरुण गोविल यांना उमेदवारी
भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी हिमाचल प्रदेशच्या मंडी लोकसभा मतदारसंघातून अभिनेत्री कंगना राणावत यांना उमेदवारी दिली आहे. दुसरीकडे रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत रामाची भूमिका करणाऱ्या अरुण गोविल यांना उमेदवारी देण्यात आली आहे. अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशच्या मेरठ लोकसभा मतदार संघातून उमेदवारी देण्यात आली आहे.