राधा तिंबलो यांना अंमलबजावणी संचालनालयाचे समन्स

0
109

तिंबलो प्रायव्हेट लिमिटेडच्या संचालक राधा तिंबलो यांना अंमलबजावणी संचालनालयाने बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी समन्स पाठविले आहेत. येत्या १८ रोजी अंमलबजावणी संचालनालयाच्या येथील कार्यालयात उपस्थित राहण्यासाठी राधा तिंबलो यांना हे समन्स पाठविले असल्याचे सूत्रांनी सांगितले. गोव्यातील बेकायदा खाण व्यवसायाशी निगडीत ज्या १६ खाण आस्थापनांना या संचालनालयाने नोटिसा पाठविल्या आहेत त्यात तिंबलो प्रायव्हेट लिमिटेडचाही समावेश आहे.