राणे पिता-पुत्रांवरील सुनावणी २२ रोजी

0
116

खाण पर्यावरण परवान्यासाठी दहा कोटींची खंडणी घेतल्याचा कथित आरोप असलेले विरोधी पक्षनेते प्रतापसिंह राणे व आमदार विश्‍वजित राणे यांच्यावर केंद्रीय गुप्तचर विभागाच्या येथील न्यायालयात दाखल केलेल्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. सदर सुनावणी दि. ८ ऑगस्ट रोजी निश्‍चित करण्यात आली होती. मात्र ती आता दि. २२ ऑगस्ट रोजी दुपारी २.३० वा. होणार आहे.