कोहिनूर मिल प्रकरणी ईडीने काल राज ठाकरे यांची तब्बल साडे आठ तास चौकशी केली. मात्र, चौकशीनंतर ईडीच्या कार्यालयातून बाहेर आल्यानंतर राज यांनी प्रसारमाध्यमांशी बोलण्याचे टाळले. केवळ स्मित हास्य करून ते निघून गेले. दरम्यान, राज यांची आज पुन्हा चौकशी होणार नाही. परंतु, याप्रकरणाशी संबंधित इतरांची चौकशी करण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.
काल सकाळी ११.३० वाजता राज ठाकरे कुटुंबासह ईडी कार्यालयात हजर झाले