गोवा सरकारने आपली मोफत पाणी योजना बंद केली आहे. 1 मेपासून ही योजना बंद केल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.
मोफत पाणी योजनेमुळे महसुलात झालेली घट व वितरण व्यवस्थेवर आलेला ताण यामुळे 1 मेपासून ही योजना रद्द करण्याचा निर्णय घेतल्याचे पाणीपुरवठा खात्याच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने 2021 मध्ये मोफत पाणी योजना सुरू केली होती. या योजनेंतर्गत ग्राहकांना दर महिन्याला 16 हजार लीटरपर्यंत पाणी मोफत मिळत होते. राज्यातील सुमारे 48 टक्के ग्राहक या योजनेचा लाभ घेत होते.
ही योजना रद्द झाल्याने आता ग्राहकांना वापरल्या जाणाऱ्या संपूर्ण पाण्यासाठी पैसे मोजावे लागणार आहेत.