राज्यात ६ बळींसह नवे ९१० कोरोना रुग्ण

0
16

राज्यात नवे कोरोना रुग्ण आणि बळींच्या संख्येत सातत्याने चढ-उतार कायम आहे. गेल्या २४ तासांत नवे ९१० रुग्ण सापडले असून, ६ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ८ हजारांच्या खाली आली आहे. गेल्या २४ तासांत ४६४८ स्वॅबच्या नमुन्यांची चाचणी करण्यात आली, त्यातील ९१० नमुने बाधित सापडले. नव्या रुग्णांपैकी ३४ जणांना इस्पितळात दाखल केले असून, ८७६ जणांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.

राज्यात गेल्या काही दिवसांपासून मोठ्या संख्येने बाधित बरे होत असल्याने सक्रिय रुग्णसंख्या सातत्याने घटत आहे. गेल्या २४ तासांत १७९४ रुग्ण बरे झाले असून, उपचारानंतर इस्पितळातून २३ जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. परिणामी सक्रिय रुग्णसंख्या ७८७० एवढ्यापर्यंत खाली आली आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५.१८ टक्क्यांवर पोहोचले आहे.