राज्यात गेल्या चोवीस तासांत नवीन २९६ कोरोनाबाधित आढळून आले असून, आणखी ४ कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यात बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १०.५६ टक्के एवढे आहे.
राज्यातील नवीन कोरोनाबाधितांच्या आणि बळींच्या संख्येत चढउतार सुरू आहे. गेल्या चोवीस तासांत केवळ २८०१ स्वॅबची तपासणी करण्यात आली, त्यातील २९६ स्वॅबचे नमुने बाधित आढळून आले आहेत. राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या ३ हजार २०२ एवढी झाली आहे, तर कोरोना बळींची एकूण संख्या ३७६४ एवढी झाली आहे.
राज्यात गेल्या चोवीस तासांत २२ जणांना इस्पितळांत दाखल करून घेण्यात आले आहे, तर इस्पितळातून बर्या झालेल्या १४ जणांना घरी पाठविण्यात आले आहे.
राज्यात नवीन बाधितांपेक्षा बरे झालेल्यांची संख्या जास्त आहे. मागील चोवीस तासांत आणखी ६१८ जण कोरोनामुक्त झाले असून, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.१४ टक्के एवढे आहे. काल ज्या चौघा जणांचा मृत्यू झाला, त्यापैकी दोघांचा बांबोळी येथील गोमेकॉमध्ये बळी गेला. उत्तर गोवा जिल्हा इस्पितळात एका कोरोनाबाधिताला मृतावस्थेत आणण्यात आले, तर दक्षिण गोव्यातील एका खासगी इस्पितळात एका कोरोनाबाधिताचा बळी गेला. कोरोनाने मृत्यू झालेल्या दोघांनी कोविड लसीचा डोस घेतला नव्हता. एका कोरोनाबाधिताने एक डोस घेतला होता, तर अन्य एकाने लसीचा डोस घेतल्याची माहिती उपलब्ध नाही.