राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होतच असून, पुन्हा एकदा जवळपास दीडशेच्या आसपास कोरोनाबाधित राज्यात सापडले. मागील २४ तासांत १४९ कोरोना रुग्ण सापडले असून, सक्रिय रुग्णसंख्या ९२६ वर पोहोचली आहे.
मागील सलग दोन दिवसांत दीडशेपेक्षा जास्त कोरोना रुग्ण सापडले होते. त्यामुळे राज्याची चिंता वाढली आहे. मागील २४ तासांत ११९५ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी १४९ जणांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचे आढळून आले. तसेच मागील चोवीस तासांत आणखी १२८ रुग्ण कोरोनामुक्त झाले.