गोव्याच्या पारंपरिक लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा शिगमोत्सव यंदा मार्चमध्ये संपन्न होणार आहे. राज्यात १९ मार्च ते २७ मार्च या कालावधीत ५ शहरांत शिगमोत्सव चित्ररथ मिरवणुका आयोजित करण्यात येणार आहेत.
शिगमोत्सवाच्या माध्यमातून विविध चित्ररथांद्वारे लोककलाकारांकडून गोव्याच्या लोकसंस्कृतीचे दर्शन घडवले जाते. या चित्ररथ मिरवणुका यंदा पाच शहरांत होणार आहेत.
१९ मार्च रोजी फोंडा, २० मार्च रोजी मडगाव, २२ मार्च रोजी वास्को, २६ मार्च रोजी पणजी आणि २७ मार्च रोजी म्हापसा या ठिकाणी शिगमोत्सव चित्ररथ मिरवणुका निघणार आहेत.