यापुढे दर बुधवारीच होणार लसीकरण

0
16

सोमवार दि. २१ फेब्रुवारीपासून राज्यात दररोज सुरू असलेले कोविड प्रतिबंधक लसीकरण बंद करण्याचा निर्णय आरोग्य खात्याने घेतला आहे. २१ फेब्रुवारीनंतर केवळ आठवड्यातून एकदाच हे लसीकरण केले जाणार आहे. दर बुधवारी सकाळी ९ ते दुपारी ४ या वेळेत लसीकरण होणार आहे, आरोग्य खात्याने स्पष्ट केले आहे. आरोग्य संचालक डॉ. सुकूर काद्रूस यांनी काल याविषयीचा आदेश जारी केला.

राज्याने १०० टक्के लसीकरणाचे उद्दिष्ट नुकतेच पूर्ण केले आहे. या पार्श्‍वभूमीवर आरोग्य खात्याने दररोज लसीकरण मोहीम न राबवण्याचा निर्णय घेतला आहे. कुणी लस घ्यायचे शिल्लक राहिले असतील, तर त्यांच्या सोयीसाठी दर आठवड्याच्या बुधवारी लसीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे २१ फेब्रुवारीनंतर राज्यातील खास लसीकरण केंद्रे बंद करण्यात येणार आहेत; पण ज्या लोकांनी लस घेतलेली नाही, अशा लोकांसाठी राज्यभरातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये लस उपलब्ध असेल आणि ती बुधवारी टोचून घेता येईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.