गेल्या तीन दिवसांत कळंगुट वागातोर आणि हरमल आदी ठिकाणी समुद्रात बुडणार्या एकूण ६ पर्यटकांना जीवरक्षकांनी वाचवले. ५ वर्षांच्या एका मुलाला कळंगुट येथील समुद्रात बुडताना वाचवण्यात आले, तसेच याच ठिकाणी ३० वर्षीय महिलेचा जीव देखील वाचवला. वागातोर आणि हरमल येथे प्रत्येकी दोघा तरुणांना बुडताना जीवरक्षकांनी वाचवले.