राज्यात शनिवारपर्यंत मुसळधार पाऊस शक्य

0
19

येत्या शनिवार दि. ६ ऑगस्टपर्यंत राज्यात मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. शनिवारपर्यंत राज्यात जोरदार पावसाची शक्यता असून, या दरम्यान काही ठिकाणी दिवसभरात ६.४ सेंमी. एवढा पाऊस पडण्याची शक्यता खात्याने व्यक्त केली. गुरुवार दि. ४ रोजी पिवळ्या रंगाचा, तर शुक्रवार दि. ५ रोजी केशरी रंगाचा इशारा देण्यात आला आहे. रविवार दि. ७ रोजी पिवळ्या रंगाचा इशारा देण्यात आला आहे. गेले काही दिवस पाऊस गायब होता; मात्र आता जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. या काळात समुद्र खवळलेला असेल आणि ताशी ४५ ते ५५ किमी. एवढ्या वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यामुळे मच्छिमारांना शनिवारपर्यंत मासेमारीसाठी समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.