येथील हवामान विभागाने येत्या शनिवार दि. 25 ऑक्टोबरपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत 0.77 इंच पावसाची नोंद झाली आहे. साखळी येथे सर्वाधिक 1.71 इंच पावसाची नोंद झाली. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पाऊस पडत आहे. राज्यात ऑक्टोबर महिन्यात आत्तापर्यंत एकूण 3.46 इंच पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात बऱ्याच भागात मागील दोन दिवसांपासून पाऊस पडत आहे. नरकचतुर्थीच्या दिवशी देखील पाऊस पडला होता. त्यानंतर आता लक्ष्मी पूजनाच्या दिवशीही पाऊस बरसला. चोवीस तासांत पेडणे येथे 1.05 इंच, काणकोण येथे 0.95 इंच, पणजी येथे 0.86 इंच, केपे 0.78 इंच अशा प्रकारे पावसाची नोंद झाली. तसेच, मुरगाव, म्हापसा, दाबोळी, धारबांदोडा, फोंडा, सांगे या भागातही पाऊस कोसळला.

