राज्यात रोजगार धोरण निश्‍चित करा : भाकप

0
168

राज्यात स्थानिकांना रोजगारात प्राधान्य मिळाले पाहिजे. कामगार खात्याने रोजगाराच्या प्रश्‍नावर धोरण निश्‍चित करण्याची गरज आहे, अशी मागणी भारतीय कम्युनिष्ट पार्टीच्या गोवा शाखेने केली आहे. गोव्यातील कंपन्यांनी सावंतवाडी येथे घेण्यात आलेल्या नोकरी मेळाव्यात सहभागी होणे धक्कादायक आहे. गोव्यातील उद्योगाकडून जमीन, साधन सुविधांचा वापर केला जातो. मात्र, रोजगार मात्र परराज्यांतील लोकांना दिला जातो. या प्रकरणाची सरकारने गंभीर दखल घेण्याची मागणी भाकपने केली.