झुवारी पुलाचे काम ३० टक्के पूर्ण

0
171

झुवारी पुलाचे काम ३० टक्के पूर्ण झाले आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री सुदिन ढवळीकर यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.
नवीन झुवारी पुलाचे पाइल फाउंडेशन पूर्णत्वाच्या मार्गावर आहेत. कॉलमचे काम सुरू करण्यात आले असून बांबोळी, शिरदोण बाजूच्या रस्त्याचे काम जूनपर्यंत पूर्ण केले जाणार आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले.

राज्यात जलवाहतुकीला चालना देण्यासाठी प्रमुख नद्यांतील गाळ उपसण्याची गरज आहे. नद्यांमध्ये अंतर्गत भागात पर्यटक बोटी सुरू करून पर्यटन व्यवसायाला चालना दिली जाईल. कॅसिनो आणि कोळसा वाहतुकीसाठी नद्यांतील गाळ उसपला जाणार असल्याची काही जणांकडून दिशाभूल करणारी माहिती देऊन नागरिकांची दिशाभूल केली जात आहे. साळ नदीतील गाळ उपसण्यासाठी दोनशे कोटी रुपये मंजूर झाले आहेत. गाळ उपसण्याचे काम पावसाळ्यानंतर हाती घेतले जाणार आहे. कुंभारजुवा फाट्यातील गाळ उपसण्याचे काम दुसर्‍या टप्प्यात घेण्याचा प्रस्ताव आहे, असेही मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. राज्यातील काही नद्यांवर अतिक्रमण झालेले आहे. यासाठी नद्यांचे सर्वेक्षण करण्याची गरज त्यांनी व्यक्तविली.