राज्यात मोसमी पावसाचे आगमन झाल्याचे हवामान विभागाने काल जाहीर केले असून शुक्रवार १२ आणि शनिवार १३ जूनला राज्यातील काही भागांत जोरदार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली आहे.
हवामान विभागाने ५ जूनला मोसमी पावसाचे आगमन होण्याचा अंदाज व्यक्त केला होता. केरळमध्ये मोसमी पावसाचे आगमन हवामान खात्याच्या अंदाजानुसार १ जूनला झाले होते.
तथापि, मोसमी पावसाच्या वाटचालीसाठी अनुकूल वातावरणाच्या अभावामुळे मोसमी पाऊस पुढे सरकण्यात अडचण निर्माण झाली होते. बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे मोसमी पाऊस पुढे सरकण्यास मदत झाली आहे, अशी माहिती हवामान विभागाच्या अधिकार्यांनी दिली.