राज्यात जीवनावश्यक वस्तूंचा मुबलक साठा आहे. वाहतुकीच्या समस्येमुळे काही दिवस समस्यांना तोंड द्यावे लागले होते. महाराष्ट्र, कर्नाटक, राजस्थान, मध्यप्रदेश या राज्याच्या मुख्य सचिवांशी चर्चा केल्यानंतर जीवनावश्यक मालाची वाहतूक सुरू झाल्याने प्रश्न सुटला आहे. राज्यातील घाऊक व्यापार्यांशी जीवनावश्यक वस्तूबाबत चर्चा केली जात आहे. राज्यातील स्वस्त धान्य दुकानात गहू, तांदूळ, डाळ, साखर उपलब्ध करण्यात आली आहे, असे नागरी पुरवठा मंत्री गोविंद गावडे यांनी सांगितले.
राज्यात लॉकडाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूच्या जास्त दराने विक्री करणार्या विक्रेत्यांवर कारवाई करण्यासाठी खास पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार रोखण्यासाठी उपाय योजना केली जात आहे. वस्तूची जास्त दराने विक्री करणार्यांचे परवाने रद्द करण्याची कारवाई केली जाणार आहे, असे गावडे यांनी सांगितले.