लॉकडाऊनमध्येही मुरगाव बंदरातून आमोण्यात होतेय कोळसा वाहतूक!

0
139

>> कॉंग्रेसची टीका; राज्यपालांना पत्र

भारताबरोबरच गोव्यातही लॉकडाऊन असताना मुरगाव बंदरावरून आमोणे येथे जी कोळसा वाहतूक करण्यात आली त्याला कॉंग्रेस पक्षाने तीव्र आक्षेप घेतला आहे. देशव्यापी लॉकडाऊनचा हा भंग असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे.

यासंबंधी कॉंग्रेस पक्षाने गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलीक यांना लिहिलेल्या पत्रातून हा कोळसा ४ एप्रिल २०२० रोजी दक्षिण आफ्रिकेतून गोव्यात आला होता. असे म्हटले आहे. लॉकडाऊनच्या काळात आलेला हा कोळसा मुरगाव बंदरावर उतरविण्यात आला आणि आता तो मुरगाव बंदरावरून बार्जेसमधून आमोणा येथील प्रकल्पात हलवण्यात येत असल्याचे दिसून आले असल्याचे प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी म्हटले आहे.