राज्यात मास्क वापर सक्तीचा आदेश जारी

0
127

राज्यात सार्वजनिक ठिकाणी,  रस्ता, कामकाज,  हॉस्पिटल आदी ठिकाणी  नागरिकांना मास्क वापर सक्तीचा आदेश जारी करण्यात आला असून मास्क वापराच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍याला १०० रुपये दंड ठोठावला जाणार आहे. दंड न भरल्यास कलम १८८ खाली कारवाई केली जाणार आहे.

या संबंधीचा आदेश अवर सचिव (आरोग्य) स्वाती दळवी यांनी काल जारी केला. राज्य सरकारने राज्यात कोरोना विषाणूच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांना मास्क वापर करण्याची सक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील औषधालयांत विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या मास्कचा वापर केला जाऊ शकतो. तसेच घरात तयार केलेले कपड्याच्या मास्कचा वापर केला जाऊ शकतो. कपड्याचे मास्क नियमित धुऊन त्याचा वापर करण्याची सूचना करण्यात आली आहे.