राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होऊ लागली असून, काल नवे २०१ कोरोना रुग्ण सापडले; मात्र मृत्यूसत्र चालूच असून, गेल्या २४ तासांत कोविडमुळे ४ जणांचा मृत्यू झाला. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या ही तीन हजारांख्या खाली आली असून, सध्या २८०४ एवढे सक्रिय रुग्ण आहेत. आतापर्यंत कोविडमुळे मृत्यूमुखी पडलेल्यांची एकूण संख्या ही ३७६८ एवढी आहे. गेल्या २४ तासात कोविडमुक्त झालेल्यांची संख्या ही ५९१ एवढी आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.३१ टक्के एवढे आहे.