राज्यात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय

0
151

बंगालच्या उपसागरातील कमी दाबाच्या पट्‌ट्यामुळे राज्यात पुन्हा एकदा मोसमी पाऊस सक्रिय बनला असून राज्यातील काही भागांत पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. मागील चोवीस तासात १.६५ इंच पावसाची नोंद झाली आहे. केपे, पेडणे, साखळी या भागात जास्त पाऊस पडला आहे. दरम्यान, येथील हवामान विभागाने सोमवार ३१ ऑगस्टपासून पावसाचे प्रमाण कमी होण्याची शक्यता वर्तविली आहे. राज्यात मागील चोवीस तासात केपे येथे सर्वाधिक ३.१८ इंच पावसाची नोंद झाली आहे.