राज्यात चोवीस तासांत २० बाधितांसह १ मृत्यू

0
13

राज्यातील कोरोनाबाधिताची सक्रिय रूग्णसंख्या ३०१ एवढी झाली आहे. राज्यात चोवीस तासांत नवीन २० कोरोनाबाधित आढळून आले असून आणखी एका कोरोना बळींची नोंद झाली आहे. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या आत्तापर्यंत ३८०१ एवढी झाली असून बाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण १.९१ टक्के एवढे आहे. नवीन बाधिताच्या संख्येत घट होत आहे. गेल्या चोवीस तासांत नवीन १०४६ स्वॅबची तपासणी करण्यात आली आहे. त्यात २० नमुने बाधित आढळून आले आहेत.

मागील चोवीस तासांत आणखी ४० जण कोरोनामुक्त झाले असून रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.३३ टक्के एवढे आहे. गेल्या चोवीस तासांत कोणालाच इस्पितळांत दाखल करण्यात आले नाही. राज्यात आत्तापर्यत २ लाख ४५ हजार ००१ जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यातील २ लाख ४० हजार ८९९ जण बरे झाले आहेत. कोरोनामुळे आत्तापर्यंत ३१ हजार ४१५ जणांना उपचारार्थ इस्पितळात दाखल करावे लागले आहेत.