Home बातम्या राज्यात चोवीस तासांत कोरोनाचे ७४ नवे रुग्ण

राज्यात चोवीस तासांत कोरोनाचे ७४ नवे रुग्ण

0

राज्यातील कोरोना सक्रिय रूग्णसंख्या साडेपाचशेपर्यंत खाली आली असून ती ५५८ एवढी आहे. राज्यात चोवीस तासांत नवीन ७४ बाधित आढळून आले आहेत. चोवीस तासांत ७२३ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. राज्यातील कोरोनाबाधित आढळून येण्याचे प्रमाण १०.२३ टक्के एवढे आहे. चोवीस तासांत एकाही नवीन बाधिताला इस्पितळात दाखल करण्यात आलेले नाही. कोरोना बळींची एकूण संख्या ३९६४ एवढी आहे. चोवीस तासांत आणखी १०१ बाधित बरे झाले आहेत. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९८.२४ टक्के एवढे आहे.