राज्यात कोरोनाचे ६१ रुग्ण; ४ बळी

0
48

गेल्या २४ तासांत राज्यात कोरोनाचे नवे ६१ रुग्ण आढळले असून, गंभीर अवस्थेतील ४ कोविड रुग्णांचा काल मृत्यू झाला. त्यामुळे आतापर्यंत कोविडमुळे राज्यात मृत्यूमुखी पावलेल्या रुग्णांची संख्या ३१६४ एवढी झाली आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या आता ८९६ पर्यंत खाली आली आहे.

गेल्या २४ तासांत कोविडमुक्त झालेल्या रुग्णांची संख्या १४८ एवढी असून, इस्पितळांतून घरी पाठवण्यात आलेल्या रुग्णांची संख्या ५ एवढी आहे. गेल्या २४ तासांत सापडलेल्या नव्या ६१ रुग्णांपैकी १९ जणांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, तर ४२ रुग्णांनी गृह विलगीकरणाचा पर्याय निवडला आहे. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ९७.६४ टक्के एवढे आहे.