राज्यात उद्यापासून पावसाचा जोर वाढणार

0
4

आतापर्यंत 64 इंच पावसाची नोंद

येथील हवामान विभागाने राज्यात उद्या मंगळवारपासून पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त केला असून ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. तर, सोमवारी काही भागात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता व्यक्त करून एलो अलर्ट जारी केला आहे. राज्यात चोवीस तासांत पावसाचे प्रमाण कमी असून केवळ 0.59 इंच पावसाची नोंद झाली. राज्यात आतापर्यंत 64.19 इंच पावसाची नोंद झाली आहे. राज्यातील पाऊस सरासरीपेक्षा 11.4 टक्के अधिक आहे.

सांग्यात सर्वाधिक पाऊस
दरवर्षी वाळपई, पेडणे या भागांत सर्वाधिक पावसाची नोंद होत होती. यंदा दक्षिण गोव्यातील मडगाव, केपे, सांगे आणि काणकोण येथे पावसाचे प्रमाण जास्त आहे. सांगे येथे सर्वाधिक 72.73 इंच पावसाची नोंद झाली आहे. म्हापसा : 64.09, पेडणे : 62.98, फोंडा : 62.33, पणजी : 62.63, जुने गोवे : 57.69, साखळी : 54.59, वाळपई : 54.59, काणकोण : 65.41 दाबोळी : 61.77, मडगाव : 72.10, मुरगाव : 61.24, केपे : 72.38, सांगे : 72.73 अशी आतापर्यंत पावसाची नोंद झाली आहे.