राज्यात आतापर्यंत एकूण< ५.१० लाख जणांचे लसीकरण

0
106

राज्यात शनिवारी दिवसभरात ६ हजार १०६ जणांना कोरोना प्रतिबंधक लशीचा डोस देण्यात आला असून राज्यात आत्तापर्यंत ५ लाख १० हजार ५८२ लशींचे डोस नागरिकांना देण्यात आले आहेत. राज्यातील इस्पितळे आणि लस केंद्रांतून ३७६१ नागरिकांना लस देण्यात आली आहे. तर, ३१ केंद्रांतील लस महोत्सवातून २३४५ नागरिकांना कोरोना लस देण्यात आली आहे. राज्यातील ९६ हजार ०१२ नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लशीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. तर, ३ लाख १८ हजार ५५८ नागरिकांना लशीचा पहिला डोस देण्यात आला आहे.

जहाजांवरील खलाशांचे १ पासून लसीकरण
जहाजांवर खलाशी म्हणून काम करणार्‍यांचे येत्या १ जूनपासून लसीकरण करण्याचे आश्‍वासन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते व बाणावलीचे आमदार चर्चिल आलेमांव यांना दिले.

जहाजांवर काम करणारे खलाशी तसेच विदेशात काम करणारे इतर गोमंतकीय यांना कोविडयोद्धे हा दर्जा देऊन त्यांना लसीकरणात प्रोत्साहन दिले जावे अशी मागणी आपण मुख्यमंत्री डॉ. सावंत यांच्याकडे केली होती. मुख्यमंत्र्यांनी आपली ती मागणी मान्य केली आहे. त्यानुसार परवा १ जूनपासून जहाजांवर खलाशी म्हणून काम करणार्‍या गोमंतकीयांचे लसीकरण काम हाती घेण्यात येणार सल्याचे आश्‍वासन आपणाला मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आलेमाव यांनी सांगितले. आपली मागणी मान्य केल्याने आलेमाव यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले.