राज्यात आणखी चौघेजण कोरोनामुळे दगावले

0
102

>> नोव्हेंबरमध्ये नऊ दिवसांत ४३ बळी

राज्यात चोवीस तासांत आणखी ४ कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांचा मृत्यू झाला आहे. नोव्हेंबर महिन्यात ९ दिवसांत ४३ जणांचा बळी गेला आहे. राज्यातील कोरोना बळीची संख्या साडे सहाशेच्या जवळ येऊन पोहोचली असून कोरोना रुग्णांच्या बळींची एकूण संख्या ६४७ झाली आहे.
गोमेकॉमध्ये एका रुग्णाचे निधन झाले. मडगाव येथील ईएसआय इस्पितळात २ रुग्णांचे निधन झाले. तर, हॉस्पिसियो इस्पितळात एका रुग्णांचा मृत्यू झाला. माशेल येथील ७७ वर्षीय पुरुष रुग्ण, सांगे येथील ७७ वर्षीय पुरुष रुग्ण, मडगाव येथील ६१ वर्षीय पुरुष रुग्ण आणि पर्वरी येथील ७२ वर्षीय महिलेचे कोरोनाने निधन झाले आहे.