आज मंगळवार दि. 20 मेपासून शनिवार दि. 24 मेपर्यंत राज्यातील काही भागांत ढगांच्या गडगडाटासह जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. वरील काळात राज्याला ‘ऑरेंज अलर्ट’ देण्यात आला आहे. नैऋत्य मान्सूनच्या वाऱ्याचा वाढलेला वेग आणि आकाशातील ढगांची टर्फलाईन (ढगांचे पट्टे) यामुळे 24 मेपर्यंत राज्यात ठिकठिकाणी वादळी पावसाची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.