येथील हवामान विभागाने बुधवार दि. 4 डिसेंबर रोजी राज्यातील काही भागांत पावसाची शक्यता वर्तविली आहे. बंगालच्या उपसागरातील फेंगल चक्रीवादळामुळे राज्यात मागील दोन दिवस ढगाळ वातावरण आहे. चोवीस तासांत 0.7 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. तसेच, फोंडा, पणजी, जुने गोवे, सांगेत पावसाची नोंद झाली आहे.