राज्यातील धरणांमधील पाण्याच्या पातळीत वाढ

0
141

राज्यात जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे प्रमुख धरणांमधील पाण्याची पातळी वाढली आहे. दक्षिण साळावली धरण ५० टक्के भरले आहे. पंचवाडीचे धरण ७९ टक्के, चापोली धरण ६५ टक्के, आमठणे धरण ५२ टक्के तर अंजुणे धरण २३ टक्के भरले आहे.

या पूर्वी जून महिन्यात धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडल्याने धरणामधील पाण्याची पातळी वाढण्यास मदत झाली आहे, अशी माहिती सरकारी सूत्रांनी दिली. साळावली धरणामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीला ३०.८३ मीटर एवढी पाण्याची पातळी होती. या महिन्याच्या अखेरीस साळावली धरणातील पाण्याची पातळी ३५.४० मीटर एवढी झाली आहे. सध्या सुमारे ४.५७ मीटर पाण्याची पातळी वाढली आहे. अंजुणे धरणामध्ये पावसाळ्याच्या सुरुवातीला पाण्याची पातळी ७२.१५ मीटर एवढी होती.

सध्या पाण्याची पातळी ७५.९५ मीटर एवढी झाली आहे. धरणातील पाण्याच्या पातळीत जून महिन्यात ३.८ मीटर एवढी वाढ झाली आहे. डिचोली तालुक्यातील आमठणे धरणामध्ये जूनच्या सुरुवातीला पाण्याची पातळी ४४.१८ मीटर एवढी होती. या धरणातील पाण्याच्या पातळीत महिनाभरात १.९२ मीटर वाढ होऊन ४६.१० मीटर एवढी झाली आहे. पंचवाडी धरणामध्ये ७९ टक्क्के पाणी भरले आहे. जून महिन्याच्या सुरुवातीला या धरणातील पाण्याची पातळी २०.१५ मीटर एवढी होती. एका महिन्यात या धरणातील पातळी २४.८२ मीटर एवढी झाली आहे. या धरणातील पाण्याच्या पातळीत ४.६७ मीटर एवढी वाढ झाली आहे.