राज्यातील कोरोना मृत्यूसत्र पुन्हा सुरू

0
26

>> फेब्रुवारीत आतापर्यंत १०२ कोरोना बळी

राज्यात सोमवारी एका दिवसासाठी खंडित झालेले कोरोना मृत्यूसत्र काल पुन्हा सुरू झाले. राज्यात काल तिघा जणांचा कोविडमुळे मृत्यू झाला. फेब्रुवारी महिन्यात आतापर्यंत बळी पडलेल्या रुग्णांची संख्या १०२ एवढी झाली असून, एकूण बळींची संख्या ३७९५ एवढी झाली आहे.

गेल्या २४ तासांत २०९९ जणांची कोरोना चाचणी करण्यात आली, त्यापैकी ५५ जणांना कोविडची बाधा झाल्याचे आढळून आले. नव्या रुग्णांपैकी दोघांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे, तर ५३ जणांनी गृहविलगीकरणाचा पर्याय स्वीकारला आहे.

गेल्या २४ तासांत आणखी ९८ रुग्ण कोरोनामुक्त झाले. परिणामी राज्यातील सक्रिय रुग्णसंख्या साडेपाचशेच्या खाली आली असून, सध्या राज्यात ५३३ सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे ९८.२३ टक्क्यांपर्यंत पोहोचले आहे.