राज्यसभेची निवडणूक 24 जुलै रोजी होणार

0
5

गोव्यातील राज्यसभेच्या एका जागेसाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार आहे. भाजपचे राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर यांचा कार्यकाळ 28 जुलै रोजी संपत आहे. या पार्श्वभूमीवर गोव्यातील राज्यसभा सदस्याची निवड करण्यासाठी 24 जुलै रोजी निवडणूक होणार असल्याचे भारतीय निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.
राज्यसभेतील 10 जागा येत्या जुलै व ऑगस्अ महिन्यात रिक्त होत असून, परराष्ट्र व्यवहारमंत्री एस. जयशंकर, तृणमूल काँग्रेसचे नेते डेरिक ओब्रायन यांच्यासह एकूण 10 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ या काळात संपत आहे.
या निवडणुकीसंबंधीची अधिसूचना 6 जुलै रोजी काढण्यात येणार आहे, तर अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख 13 जुलै अशी आहे. तृणमूल काँग्रेसचे राज्यसभा खासदार लुईझिन फालेरो यांनी आपल्या पदाचा यापूर्वीच राजीनामा दिलेला असून, या रिक्त झालेल्या जागेसाठीही 24 जुलै रोजी निवडणूक होणार आहे.