राजौरीतील नियंत्रण रेषेजवळ स्फोट, दोन जवान शहीद

0
42

जम्मू-काश्मीरमधील राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेजवळ झालेल्या स्फोटात लष्कराचे दोन जवान शहीद झाले. शनिवारी राजौरी जिल्ह्यात नियंत्रण रेषेपासून सटी अग्रीम चौकीजवळ हा स्फोट झाला. भारतीय लष्कराने सांगितले की, नौशेरा सेक्टरमध्ये लष्कराचे पथक पेट्रोलिंग करत होते, त्याचवेळी नियंत्रण रेषेजवळ हा स्फोट झाला. या स्फोटात एक लष्करी अधिकारी आणि एक जवान गंभीर जखमी झाले. दोघांचाही उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.