राजस्थानात टँकरची बसला धडक, १२ जणांचा मृत्यू

0
24

राजस्थानमधील बाडेमर-जोधपूर महामार्गावर एका खासगी प्रवासी बसला टँकरने धडक दिल्याने १२ लोकांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. एका प्रवाशाने दिलेल्या माहितीनुसार, बस बालोत्रा येथून सकाळी ९.५५ वाजता निघाली आणि चुकीच्या बाजूने येणार्‍या टँकरने बसला धडक दिल्याने हा अपघात झाला. टँकरची बसला धडक झाल्यानंतर बसला आग लागली. या बसमध्ये २५ प्रवासी होते, प्रशासनाला दहा जणांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मोठ्या संख्येने पोलीस दल देखील घटनास्थळी दाखल झाले होते.