केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानमध्ये विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख काल बदलली. त्यानुसार आता 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे. यापूर्वी 23 नोव्हेंबरला मतदान होणार होते. पण देवउठणी एकादशी या मुहूर्तामुळे मतदानाची टक्केवारी कमी होण्याची शक्यता वर्तवली जात होती. तसेच 23 नोव्हेंबरला धार्मिक कार्यक्रम आणि अनेक विवाह सोहळे आयोजित होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन हा बदल करण्यात आला आहे. आयोगाने केवळ मतदानाच्या तारखेत बदल केला आहे; मात्र अन्य वेळापत्रक पूर्वीप्रमाणेच ठेवले आहे.