तीन अल्पवयीनांकडून मुलाला बेदम मारहाण

0
17

कांपाल-पणजी येथे काल तीन अल्पवयीन मुलांनी बेसबॉलच्या बॅटने एका अल्पवयीन मुलाला मारहाण केली. या मारहाणीत सदर मुलगा गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात (गोमेकॉ) उपचार सुरू आहेत. अमलीपदार्थ प्रकरणातून हा हल्ला करण्यात आल्याचा कयास व्यक्त केला जात आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 15 ते 17 वयोगटातील तीन मुलांनी बेसबॉलच्या बॅटच्या साहाय्याने एका अल्पवयीन मुलावर प्राणघातक हल्ला केला. त्याची प्रकृती गंभीर असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या हल्ला प्रकरणातील तिघा मुलांची मेरशी येथील बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. या मारहाणीच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. या प्रकरणी पणजी पोलीस तपास करीत आहे.