राज्यात बुधवारपासून पावसाने पुन्हा जोर धरला असून काल बुधवारी राजधानी पणजीत सकाळी ८.३० ते ५.३० या केवळ ९ तासांत अडीच इंच पावसाची नोंद झाली आहे. संततधार पावसामुळेजनजीवनावर परिणाम झाला असून गुरुवारपर्यंत काही भागात जोरदार पाऊस कोसळण्याची शक्यता येथील हवामान विभागाने वर्तविली आहे.
राज्यभरात मागील चार दिवसांपासून पाऊस सुरू असला तरी दर दिवशी पावसाचे प्रमाण कमी होत होते. तथापि, बुधवारपासून पावसाने पुन्हा एकदा जोर धरला आहे. मागील चोवीस तासात १.३३ इंच पावसाची नोंद झाली असून सर्वाधिक पावसाची नोंद काणकोण येथे २.०९ इंच झाली आहे. आहे.