रस्ता अपघातात 13 दिवसांत राज्यात 12 जणांचा मृत्यू

0
19

राज्यात गेल्या 13 दिवसांत रस्ता अपघातात 12 जणांचा बळी गेला असून राज्यात दर 24 तासांत एका मृत्यूची नोंद झाली आहे.
राज्यात शनिवार 11 नोव्हेंबर ते गुरुवार 23 नोव्हेंबर या कालावधीत रस्ते अपघातात एकूण 12 जणांना आपला जीव गमवावा लागला. 12 मृतांपैकी सात जण 50 आणि त्यापेक्षा कमी वयोगटातील आहेत. मृत व्यक्ती 19 ते 77 वयोगटातील आहेत. गोवा नागरी आणि ग्राहक कृती नेटवर्कने (गोवाकॅन) या संदर्भात अपघाताची माहिती संकलित करून आणि जारी केला आहे.

4.38 लाख जणांना दंड
गोवा वाहतूक पोलिसांनी जानेवारी 2023 ते ऑक्टोबर 2023 या 10 महिन्यांत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना जवळपास 4.38 लाख जणांना दंड ठोठावून सुमारे 25.65 कोटी रुपयांचा दंड वसूल केला आहे. तसेच पोलिसांनी 12 अल्पवयीन मुलांना परवाना आणि इतर आवश्यक कागदपत्रांशिवाय वाहन चालवल्याबद्दल 86,500 रुपयांचा दंड ठोठावला आहे.