Home Featured रशियाकडून तेल आयातीसाठी अमेरिकेची भारताला परवानगी

रशियाकडून तेल आयातीसाठी अमेरिकेची भारताला परवानगी

0

अमेरिका-इस्रायलने संयुक्तपणे केलेल्या हल्ल्यामुळे संपूर्ण इराण हादरले आहे. इराणच्या प्रतिहल्ल्यामुळे हे युद्ध आणखी भडकले आहे. या युद्धाच्या झळा आता जगातील अनेक देशांना बसत असून तेलाच्या निर्यातीत अडथळे निर्माण झाले आहेत. अमेरिकेने भारतासाठी एक मोठा निर्णय घेतला असून समुद्रात अडकलेल्या रशियन तेल टँकर खरेदी करण्यासाठी भारताला अमेरिकेकडून 30 दिवसांची सूट देण्यात आली असल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकेकडून सातत्याने भारताच्या निर्णयांमध्ये हस्तक्षेप किंवा आदेश दिले जात असल्याने विरोधकांनी मोदी सरकारवर टीकास्त्र डागले आहे.