रविवारी राज्यात कोरोनाने दोन मृत्यू

0
212

राज्यात गेल्या चोवीस तासांत २ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला असून नवीन ६५ कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. राज्यातील कोरोना बळींची एकूण संख्या ७४१ झाली आहे. कोरोना रुग्णांची एकूण संख्या ५१ हजार २९५ एवढी झाली असून सध्याच्या रुग्णांची संख्या ९०१ एवढी झाली आहे.
नववर्षाच्या पहिल्या दोन दिवसात एकाही कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली नव्हती. चोवीस तासांत २ कोरोना रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. बांबोळी येथील गोमेकॉमध्ये म्हापसा येथील ७५ वर्षीय पुरुष रुग्ण आणि वेळ्ळी येथील ५९ वर्षीय पुरुष रुग्णाचे निधन झाले आहे.

राज्यातील आणखीन ८३ कोरोना रुग्ण बरे झाले आहेत. बरे झालेल्या कोरोना रुग्णांची एकूण संख्या ४९ हजार ६५३ एवढी झाली आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९६.८० टक्के एवढे आहे. राज्यातील कोविड प्रयोगशाळेत चोवीस तासांत १३२२ स्वॅबच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे. तपासणी करण्यात आलेल्या नमुन्यांपैकी ४.९२ टक्के स्वॅबचे नमुने पॉझिटिव्ह आढळून आले आहेत.

कोरोनाचे सौम्य लक्षण असलेल्या नवीन ३३ जणांनी होम आयसोलेशनचा पर्याय स्वीकारला आहे. होम आयसोलेशनखालील कोरोना रुग्णांची एकूण संख्या २६ हजार ८८० एवढी झाली आहे. इस्पितळात नवीन २९ कोरोना रुग्णांना दाखल करण्यात आले आहेत.

मडगाव आरोग्य केंद्राच्या क्षेत्रात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. मडगावातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या १०१ एवढी झाली आहे. वास्को आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील कोरोना रुग्णांची संख्या वाढली आहे. वास्कोतील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५२ झाली आहे. फोंडा आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील रुग्णांची संख्या ५७ आहे. पणजी उच्च आरोग्य केंद्राच्या क्षेत्रातील सध्याच्या कोरोना रुग्णांची संख्या ५८ झाली आहे.