
भारताचा ऑफ ब्रेक गोलंदाज रविचंद्रन अश्विन याने आपल्या ५४व्या कसोटीत ३०० कसोटी बळींचा टप्पा गाठला. अशी कामगिरी करणारा तो जगातील सर्वांत वेगवान खेळाडू ठरला. ऑस्ट्रेलियाच्या डेनिस लिली यांना यासाठी ५६ कसोटी सामने खेळावे लागले होते. डावांचा विचार केल्यास श्रीलंकेचा ऑफ ब्रेक गोलंदाज मुथय्या मुरलीधरनने ५८ कसोटींत ३०० बळी पूर्ण केले होते. डावांचा विचार केल्यास मुरलीधरनने ९१ डावांत तर अश्विनने १०१ डावांत त्रिशतकी बळींचा टप्पा गाठला आहे. अश्विनच्या ३०० पैकी केवळ ८४ बळी भारताबाहेर आहेत. तर यातील केवळ ४१ बळी भारतीय उपखंडाबाहेरील आहेत. भारताकडून अनिल कुंबळे (६१९), कपिलदेव (४३४), हरभजन सिंग (४१७) व झहीर खान (३११) यांना अश्विनपेक्षा जास्त बळी घेतले आहेत.