रणबीर कपूरला ईडीचे समन्स; उद्या चौकशी

0
12

>> महादेव बुक बेटिंग ॲप प्रकरण

बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता रणबीर कपूरला सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) काल समन्स बजावले. त्याद्वारे 6 ऑक्टोबरला चौकशीसाठी हजर राहण्याचा आदेश ईडीने रणबीर कपूरला दिला आहे. ‘महादेव बुक’ ऑनलाइन बेटिंग ॲप प्रकरणी रणबीर कपूरला ईडीकडून समन्स बजावण्यात आले आहे. रणबीर कपूर हा ॲपचे प्रमोशन करत होता आणि रणबीरला यासाठी मोठ्या प्रमाणात रोख मिळाली आहे, असा दावा ईडीने केला आहे.
ऑनलाइन गेमिंग ॲप प्रकरणातील आरोपी सौरभ चंद्राकरच्या दुबईतील लग्नात रणबीर महादेव सहभागी झाला होता. सौरभवर हवालाद्वारे कलाकारांना पैसे दिल्याचा आरोप आहे. तसेच रणबीर कपूर या ॲपचे प्रमोशन करत होता. त्याला मोठी रक्कम रोख स्वरूपात मिळाल्याचा ईडीचा दावा आहे. ईडी ऑनलाइन गेमच्या जाहिरातींद्वारे निधीची देखील चौकशी करेल. आता रणबीर कपूर ईडीसमोर हजर राहतो की त्याच्या वकिलामार्फत समन्सला उत्तर देणार हे पाहणे बाकी आहे. दरम्यान, या प्रकरणात याआधी 14 बॉलिवूड स्टार्सची नावे समोर आली होती.