दिल्लीत काल रंगलेल्या ६७ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळ्यात शिवाजीराव गायकवाड अर्थात रजनीकांत यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले. उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते रजनीकांत यांना भारतीय चित्रपट क्षेत्रातील सर्वोच्च अशा दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. तसेच अभिनेत्री कंगना राणौत व अभिनेता मनोज वाजपेयी यांना अनुक्रमे सर्वोत्कृष्ठ अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ठ अभिनेत्याच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.