येत्या 4-5 दिवसांत तापमानात वाढ होणार

0
16

येथील हवामान विभागाने राज्यातील तापमानात पुढील चार-पाच दिवसांत 3 अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता काल वर्तविली. बंगालच्या उपसागरातील दक्षिण पूर्व भागात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला असून, 1 फेब्रुवारीला श्रीलंका किनाऱ्याजवळ पोहोचण्याची शक्यता आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हवेत गारवा, वारे वाहण्याची शक्यता आहे. त्यानंतर पुढील चार-पाच दिवसात हळूहळू तापमानात वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.