येत्या लोकसभा निवडणुकीत ‘मगो’चा भाजपला पाठिंबा

0
8

>> दोन्ही मतदारसंघात भाजपचे पारडे जड

येत्या दोन तीन महिन्यांत होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत भाजपला पूर्ण पाठिंबा देण्याचा निर्णय काल महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने घेतला. मगो पक्षाच्या केंद्रीय समितीच्या काल झालेल्या बैठकीत सदर निर्णय घेण्यात आला. राज्यातील उत्तर गोवा तसेच दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात भाजपला पाठिंबा देण्याचा निर्णय मगोच्या केंद्रीय समितीने घेतला. मागच्या लोकसभा निवडणुकीत मगो पक्षाने भाजपला पाठिंबा दिला नव्हता त्यामुळे भाजपचा दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात पराभव झाला होता. भाजप उमेदवाराचा या निवडणुकीत खूपच कमी मतांनी हा पराभव झाला होता. मात्र त्या निवडणुकीत मगोने भाजपला जर पाठिंबा दिला असता तर याभाजप उेदवाराचा विजय निश्चितच झाला असता असे मत राजकीय निरीक्षकांनी त्यावेळी व्यक्त केले होते.
आता मगोने भाजपला पाठिंबा व्यक्त केल्याने दक्षिण गोवा मतदारसंघाबरोबरच उत्तर गोवा मतदारसंघातही भाजपचे पारडे जड झाले असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
गेल्या विधानसभा निवडणुकीत मगो पक्षाचे एकच उमेदवार म्हणजे पक्षाचे एक प्रमुख नेते सुदिन ढवळीकर हे विजयी झाले होते. आणि त्यांनी भाजपला पाठिंबा दिल्यामुळे त्यांचा राज्य मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला होता. त्यांच्याकडे वीज खाते सोपवण्यात आलेले आहे.