‘यूपीएस’बाबत सरकार सकारात्मक : मुख्यमंत्री

0
9

राज्य सरकार राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना युनिफाइड पेन्शन स्कीम (यूपीएस) लागू करण्याबाबत सकारात्मक आहे, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी काल दिली.

केंद्र सरकारने गेल्या 24 ऑगस्ट रोजी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन ‘युनिफाइड पेन्शन स्कीम’ लागू केली आहे. केंद्र सरकारने जाहीर केलेल्या या यूपीएस योजनाचा वित्त विभाग अभ्यास करीत आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.

ही योजना सरकारी कर्मचाऱ्यांना आजीवन मासिक लाभ म्हणून त्यांच्या शेवटच्या काढलेल्या पगाराच्या निम्मी रकमेच्या स्वरूपात दिली जाणार आहे. या योजनेत पेन्शनधारकांना लाभ देणारी इतर अनेक वैशिष्ट्‌‍ये आहेत. महागाईच्या अनुषंगाने नियतकालिक महागाई सवलत वाढ आणि किमान 10 वर्षे सरकारी सेवा असलेल्या निवृत्तिवेतनधारकांना किमान 10 हजार रुपये दरमहा पेन्शन मिळणार आहे. केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी योजना जाहीर केली आहे आणि राज्यांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना योजना स्वीकारण्याचे स्वातंत्र्य दिले आहे, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.