वेर्णा पोलिसांनी वेळसाव येथील एका युवतीच्या खून प्रकरणी संशयित किशन कळंगुटकर (वय २६, रा. नवेवाडे) या तरुणाला अटक केली. संशयिताने बुधवारी त्याची मैत्रीण दिया नाईक (वय १८) हिचा वेळसाव किनार्यावर खून केला होता. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित किशनचे दिया हिच्याशी प्रेमसंबंध होते; मात्र तो त्या प्रेम प्रकरणात असमाधानी होता. त्यामुळे त्याने त्या मुलीचा काटा काढण्याचा कट रचला. त्यानंतर बुधवारी दुपारी संशयिताने दिया हिला वेळसाव किनार्यावर नेले व चाकूने वार करून तिचा खून केला होता.