५२व्या इफ्फीतील आयसीएफटी युनेस्को गांधी पुरस्कारासाठी स्पर्धेत असलेल्या नऊ चित्रपटांची यादी काल जाहीर करण्यात आली. या स्पर्धेसाठी निवड झालेल्या चित्रपटांत टिफिन (गुजराती), कमिटमेंट हसन (तुर्की), अबेस्ट आबेद (इराणी), पीएम (तमिळ), तालेह हरून (फ्रेंच), नाईटफॉरेस्ट (जर्मनी), निरये ठाठकलुम्ला मारम (मल्याळम्), ऑलिव्हर पेयॉन (फ्रेंच), व्हेन प्रोमोग्रॅनेट्स हाऊल (अफगाणिस्तान) या चित्रपटांचा समावेश आहे.